Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड पोलिसांकडून कारवाईचा धडाका; जिल्ह्यातील आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळ्या, गावगुंडही दणाणले

Beed Latest news : बीड पोलिसांकडून कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळ्या आहेत. यामुळे गावगुंडही दणाणले.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यानंतर आता बीड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. बीडमध्ये आता आणखी एका गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर गावगुंडाचे धाबे दणाणले आहेत.

बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत आणखी एका गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी या गुंडाची रवानगी हरसुल कारागृहात केली आहे.

अंबाजोगाई येथील क्रांतीनगर भागात राहणाऱ्या मोहन दौलत मुंडे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नवनीत यांनी 4 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी हा प्रस्ताव पारित करून याबाबतचे आदेश दिले आहे.

मोहन मुंडे याच्यावर परळीसह इतर विविध ठिकाणी एकूण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर बरेच दिवसांपासून पोलीस प्रशासनाची नजर होती. अखेर जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मुंडेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या या कारवाईमुळे गावगुंडांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

अश्विनी खिंडकर यांचं जिल्हा कारागृह अधीक्षकांना पत्र

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह इतर आरोपींपासून जिल्हा कारागृहातील बराकमध्ये जीवितास धोका असल्याचे पत्र धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांची अश्विनी खिंडकर यांनी जिल्हा कारागृह अधीक्षकांना दिलं आहे. माझ्या पतीला सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवावे. त्यांच्या जीवाला आरोपींपासून धोका असल्याचे अश्विनी खिंडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT