Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : बसची दुचाकीला जोरदार धडक; पती- पत्नीचा जागीच मृत्यू

Beed News : दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर समोरून भरधाव वेगाने अचानक बस आली. बसने दुचाकीला जबर धडक दिली. धडक बसताच दोघेजण रस्त्यावर दूरवर फेकले गेले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : दुचाकीने बाजाराला जात असलेल्या पती- पत्नीवर काळाने घाला घातला आहे. पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर समोरून आलेल्या भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे मार्गावर वाहतूक खोळंबली होती. 

बीडच्या पाटोदा ग्रामीण रुग्णालयासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात बाळु केशव वायकर व त्याची पत्नी लता बाळु वायकर असे मृत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. वायकर दाम्पत्य हे पाटोदा तालुक्यातील भाटेवाडी येथील रहिवासी असून आज पाटोदा येथील बाजाराचा दिवस असल्याने दोघेजण दुचाकीने बाजार करण्यासाठी जात होते. मात्र पाटोदा शहरात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. 

बसच्या धडकेत दूरवर फेकले गेले 

वायकर दाम्पत्य दुचाकीवरून जात असताना पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर समोरून भरधाव वेगाने अचानक बस आली. या बसने दुचाकीला जबर धडक दिली. धडक बसताच दोघेजण रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सदरील बस ही नांदेड कडून पुण्याकडे जात होती. 

महामार्गावर वाहतूक खोळंबली

अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. तर रस्त्यावर पडलेले दोघांचे मृतदेह बाजूला करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. यानंतर महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. यानंतर दोघांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT