Fire In Shivshahi Bus Saam Tv
महाराष्ट्र

Beed Bus Fire: प्रवासी उतरले खाली अन् बसने घेतला पेट; बीडमध्ये मोठी दुर्घटना टळली

Fire In Shivshahi Bus: प्रवासी उतरले खाली अन् बसने घेतला पेट; बीडमध्ये मोठी दुर्घटना टळली

विनोद जिरे

Fire In Shivshahi Bus:

लातूरहून परभणीच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या, धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या भीषण आगीत शिवशाही बस जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये प्रवासी देखील होते. मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

ही घटना बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या दरम्यान घडली आहे. तर यादरम्यान परळी नपचे अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होते. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून परभणीच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसने परळी शहरातील बसस्थानकाच्या बाहेर येताच अचानक पेट घेतला. ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात येताच, त्यांनी वाहकांच्या लक्षात ही बाब आणून दिली.  (Latest Marathi News)

यानंतर काही क्षणात सर्व प्रवासी बसच्या खाली उतरले. या दरम्यान बघता बघता सर्व एसटी बसने पेट घेतला आणि एका क्षणात बस होत्याची नव्हती झाली.

पूर्ण बस जळून खाक झालीय, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली असून यामध्ये एसटी महामंडळाचे लाखोचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: ही ५ लक्षणं दिसली तर समजा ब्लड प्रेशर वाढलंय; हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी लक्षणं ओळखा

Emergency Car Tips: वाटेत गाडी बिघडल्यास काय कराल? 'या' सोप्या टिप्सने करा आणि सुरक्षित राहा

Shweta Tripathi : बॉलिवूड अभिनेत्रीनं चेंबूरमध्ये घेतलं घर, किंमत वाचून थक्क व्हाल

Schoking News : "तू खूप क्युट दिसतेस" स्कुल बस चालकाकडून ९ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; संभाजीनगर हादरले

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळा सोनं १,१०० रुपयांनी वाढले; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT