Israel Hamas War: युद्धामुळे गाझात परिस्थिती हाताबाहेर, 7 रुग्णालयात आरोग्य सेवा बंद; लोकांची पाण्यासाठी वणवण

Gaza Patti News: युद्धामुळे गाझात परिस्थिती हाताबाहेर, 7 रुग्णालयात आरोग्य सेवा बंद; लोकांची पाण्यासाठी वणवण
Gaza Patti News
Gaza Patti NewsSaam Tv
Published On

Israel Hamas War:

इस्रायल आणि हमास युद्धादरम्यान गाझामधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गाझामध्ये मूलभूत सुविधांबाबत मोठं संकट निर्माण झालं आहे. 'सीएनएन'ने पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याचा हवाला देत शुक्रवारी सांगितले की, गाझामधील सात रुग्णालयांचे हवाई हल्ल्यात नुकसान झाले आहे, त्यामुळे तेथे रुग्णालयात रुग्णांवरील उपचार बंद करण्यात आले आहेत.

तसेच 21 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही सेवा बंद आहे. याशिवाय या संघर्षात आतापर्यंत 64 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा म्हणाले, 'इस्रायलच्या हल्ल्यामुळे सात रुग्णालयात सेवा बंद आहे आणि 21 प्राथमिक आरोग्य केंद्रेही सेवेतून बाहेर आहेत. 64 वैद्यकीय कर्मचारी ठार झाले आणि 23 रुग्णवाहिका नष्ट झाल्या.' असं असलं तरी सीएनएनने युद्धादरम्यान मृत्यू झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केलेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gaza Patti News
Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

याबाबत निवेदन जाहीर करत संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे की, 'सध्या 60 टक्क्यांहून अधिक प्राथमिक देखभाल सुविधा केंद्र बंद आहेत आणि गाझाची रुग्णालये खराब अवस्थेत आहेत. हे संकट प्रामुख्याने वीज, औषध, वैद्यकीय उपकरणे आणि विशेष कर्मचारी यांच्या तीव्र टंचाईमुळे निर्माण झाले आहे. गाझाची रुग्णालये इंधन, पाणी आणि विजेच्या तीव्र टंचाईमुळे बंद आहेत.'

लोकांची पाण्यासाठी वणवण

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत केअर वेस्ट बँक आणि गाझाचे देश संचालक हिबा टिबी यांनी सांगितलं की, इंधनाच्या कमतरतेमुळे गाझामधील रहिवाश्यांना दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. कारण बहुतेक उपलब्ध पाणी योग्य प्रक्रियेशिवाय पिण्यायोग्य नाही. टिबी म्हणाले, 'लोकसंख्येला शुद्ध पाणी देण्यासाठी आम्हाला इंधनाची गरज आहे. हे सर्व खूप कठीण कोट चाललं आहे.'

Gaza Patti News
Cricket World Cup 2023: वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसाठी मुंबई पोलीस सज्ज, मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर; VIDEO

आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, 7 ऑक्टोबरपासून गाझा पट्टीमध्ये मृतांची संख्या 4,127 झाली आहे. तसेच 13,162 लोक जखमी झाले, सीएनएनच्या म्हणण्यानुसार असे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी सांगितले. गंभीर परिस्थिती लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस उत्तर सिनाई येथे आले आहेत, त्यांनी इजिप्तच्या सीमेपलीकडे गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com