Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 17 बांगलादेशी घुसखोरांना अटक
Borivali News
Borivali NewsSaam Tv
Published On

>> संजय गडदे

Mumbai Crime News:

बांगलादेशातून अवैधमार्गाने भारतात येवून बनावट कागदपत्रे तयार करून मध्य पूर्वेतील देशातील व्हिसा प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १ बांग्लादेशी एजंट सह १७ बांग्लादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांसह मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.

बोरिवली पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांसंदर्भात केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर बोरिवली पोलिसांच्या एटीसी पथकाने ही कारवाई केली. बोरिवली येथील ३, नालासोपारा येथून ४ आणि पालघर विरार येथून १० असे एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Borivali News
Cricket World Cup 2023: वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषक सामन्यांसाठी मुंबई पोलीस सज्ज, मार्गदर्शक सूचना केल्या जाहीर; VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली पश्चिमेकडील आकाश स्वीट समोर काही बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांच्या एटीसी पथकातील अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबर रोजी मिळाली. माहितीची खातर जमा करतात एटीसी पथकाचे सपोनि साळुके, पोउनि निंबाळकर, पोउनि पाटील व पोलीस अमलदार यांच्या पथकाने सापळा रचून सुमन मोमीन सरदार (३१ वर्ष), ओमर फारूख मोल्ला (२७ वर्ष),सलमान आयुब खान (३४ वर्ष) या बांग्लादेशीना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

या तिघांकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे कोणतेही वैद कागदपत्र नव्हते. खोटे नाव व बनावट कागदपत्रांचा वापर करून, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट तयार करून फसवणूक केली म्हणून कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१ भादवि सह नियम ३ सह ६ पारपत्र, ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरीक कायदा १९४६ अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली.

Borivali News
Election Survey: राजस्थानमध्ये कोणाची येणार सत्ता? भाजप की काँग्रेस, ताज्या सर्वेक्षणात कोण पुढे; जाणून घ्या

अवैध मार्गाने बांगलादेशींना भारतात घेऊन येणारा एजंट सलमान आयुब खान (३४ वर्ष) सुमन मोमीन सरदार (३१ वर्ष) यांनी चौकशी दरम्यान अन्य 4 बांगलादेशी नागरिक नालासोपारा आणि दहा बांगलादेशी नागरिक पालघर विरार येथे असल्याचे कबूल केले. यानंतर तपास पथकाने नालासोपारा येथून ४ आणि विरार, पालघर येथून १० बांग्लादेशी यांना ताब्यात घेवून अटक केली.

या सर्व बांगलादेशी घुसखोरांना आज न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने या सर्व बांगलादेशी घुसखोर आरोपींना 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व बांगलादेशी आरोपी मुंबईत नेमके कशासाठी आले होते काही आतंकवादी कारवाया करण्याचा यांचा उद्देश होता काय यासंदर्भात बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com