Beed: जलयुक्त घोटाळा प्रकरण! आणखी 4 जणांना बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: जलयुक्त घोटाळा प्रकरण! आणखी 4 जणांना बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

विनोद जिरे

बीड: जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. यामध्ये २ निवृत्त अधिकाऱ्यांसह २ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बीड (Beed) जिल्ह्यात जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील (Agriculture Department ) निवृत्त अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर परत एकदा ४ जणांना परळी पोलिसांनी (police) ताब्यात घेतले आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Beed parli police jalyukt shivar scam)

हे देखील पहा-

दरम्यान, अटक (Arrested) करण्यात आलेल्यांपैकी शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे २ जण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत. तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. २०१८ मध्ये जलयुक्त शिवारच्या कामामध्ये घोटाळ झाल्याच्या अनेक तक्रारी देण्यात आले होते. यानंतर परळी पोलीस (police) ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते. जवळपास २ ते अडीच कोटी रुपयांचे हे प्रकरण आहे. गेल्या महिन्यामध्ये याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली होती.

तसेच कंत्राटदारांकडे अडकलेल्या ९० लाख रुपयांची रिकव्हरी करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. यानंतर परत ४ जणांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. जलयुक्त शिवार घोटळ्याच्या चौकशीला जरी उशीर झाला असला तरी आता मात्र, या तपास कामाला वेग आला आहे. याप्रकरणी परळी पोलीस स्टेशनमध्ये २ कोटी ४१ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये कृषी विभागात कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदारांच्या नावाचा समावेश होता.

बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना ९० लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते. या आदेशाबरोबरच पोलिसांनी देखील अटकेची कारवाई सुरु केली आहे. काँग्रेसचे वसंत मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजना मध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती.

यानंतर गेल्या अनेक दिवसापासून याची चौकशी सुरू आहे. बीड जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील संस्था आणि अधिकाऱ्यांना ९० लाख रुपये वसूल करण्याचे औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालकानी आदेश दिले होते या आदेशाबरोबरच पोलिसांनी देखील अटकेची कारवाई सुरू केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : हाती येईल पैसा मात्र 'ही' एक गोष्ट टाळा, वाचा आजचे राशी

Mira Bhayandar : मोठी बातमी! मनसेच्या अविनाश जाधवांना पहाटे पोलिसांनी घेतलं ताब्यात, मीरा-भाईंदरमधील मोर्चापूर्वी कारवाई

Success Story: IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; इंजिनियरिंग केल्यानंतर क्रॅक केली UPSC; अनुपमा अंजली यांचा प्रेरणादायी प्रवास

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

SCROLL FOR NEXT