Mahadev Munde Case Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Beed News : बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण. यातील आरोपी अद्याप अटकेत नाही

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा १८ महिन्यापूर्वी धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात अद्याप एकही आरोपीला अटक झाली नाही. परंतु आता बाळा विजयसिंह बांगर यांचा जबाब काल केज येथे पोलिसांनी नोंदवला असून साधारण ६ तास त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. यामुळे सदर प्रकरणात त्या दिशेने तपास देखील सुरू केला आहे.

बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील यातील आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मात्र हत्येती आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत.

दोन दिवसांपूर्वी विजयसिंह बाळा बांगर यांनी पाटोदा येथे पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. यात महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड आणि त्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनी केल्याचा दावा विजयसिंह बाळा बांगरने केला आहे. तर वाल्मीक कराडला भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्यांना मारला. त्यांनी व्यापारी महादेव मुंडे यांचा एक मासाचा तुकडा आणल्याचा धक्कादायक खुलासा पाच दिवसांपूर्वी केला आहे.

सहा तास कसून चौकशी 

त्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवावा; अशी मागणी केली. तसेच या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी देखील तातडीने सूत्रे हलवत तब्बल सहा तास चौकशी करत बाळा बांगर यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT