ऐकलंत.. बीडच्या ओबीसी मेळाव्यात गोपीनाथ मुंडेंचा वारसा थेट धनंजय मुंडेंना देण्याची भाषा छगन भुजबळांनी केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.. मेळाव्यातील स्टेजवरील बॅनरवरून पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यात आला.. आणि दुसरीकडे ओबीसी मेळाव्यापासून दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांना धक्का देणारं विधान भुजबळांनी केलं...
इतकचं काय तर भुजबळांनी प्रोटॉकॉल मोडून थेट मेळाव्याच्या सुरुवातीलाच शायरी म्हणत गैरहजर राहणाऱ्या ओबीसी नेत्यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला... दुसरीकडे भुजबळांची विधानाची रि ओढत नाव न घेता धनंजय मुंडेंनीही पंकजा मुंडेंना टार्गेट केल्याची चर्चा आहे...
विशेष म्हणजे धनंजय मुंडे यापूर्वी ओबीसी मेळाव्यांना कधीच हजर राहिले नाहीत... तर दुसरीकडे ओबीसी आंदोलनाची चळवळ सुरु झाल्यापासूनच पंकजा मुंडेही मेळाव्यांपासून दूर राहिल्या. बीडमध्ये मेळावा असूनही पंकजा मुंडेंनी मेळाव्याला दांडी मारली.. तर धनंजय मुंडेंनी ओबीसी मेळाव्याला आवर्जून हजेरी लावलीय. त्यामुळे ओबीसीचं नेतृत्व धनंजय मुंडेंच्या हातात देण्याचं सूतोवाच भुजबळांनी का केलं? पंकजा मुंडेंना साईडलाईन करण्याचा हा डाव आहे का? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जातायतं..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.