Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: '..तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असतील', मराठा आरक्षणासाठी तरुण चढला टॉवरवर

Maratha Reservation Protest: '..तर याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असतील', मराठा आरक्षणासाठी तरुण चढला टॉवरवर

Satish Kengar, विनोद जिरे

Beed News:

बीडच्या वाहिरा येथील तरुण मराठा आरक्षणाच्या मागणीसह गावातील विविध मागण्यांसाठी, आष्टी तालुक्यातील कासारी गावातील जिओच्या टावरवर चढून बसलाय.

गेल्या दोन दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू असताना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, या तरुणाचं रात्री देखील हे आंदोलन सुरूच आहे. अशोक माने असं आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

वाहिरा गावातील अशोक माने यांनी मराठा आरक्षणासह वाहिरा गावातील रस्ता आणि विविध समस्या बाबत कालपासून टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

गेल्या एक वर्षापासून जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन देऊनही त्याची कोणतीच दखल घेतली नाही. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील मार्गी लागत नाही. यामुळे अशोक माने या तरुणाने संतप्त होत, शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनातील कोणताच अधिकारी माझ्याकडे अध्याप आला आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. मात्र त्यांनी देखील आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे आता मी जर काही केलं, तर याला राज्याचे मुख्यमंत्री आणि बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या जबाबदार असतील. असा संतप्त आणि टोकाचा इशारा शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या अशोक माने यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: शिमला-मनाली विसराच! हिरवागार निसर्ग अन्...मुंबईपासून अगदी काहीच अंतरावर आहेत 'हे' हिल स्टेशन, एकदा भेट द्याच

Raj Thackeray : "मराठी माणसाला वापरून फेकून द्यायचं"; राज ठाकरे संतापले, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'वर काय म्हणाले?

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याविरोधात टीका करणं भोवलं, मनसे नेत्यावर हल्ला; नेमकं घडलं काय?

Shocking News : २७ ऊसतोड कामगारांना ओलीस ठेवलं, मारहाण केली, गरोदर महिलेलाही त्रास; पुण्यातील धक्कदायक प्रकार!

SCROLL FOR NEXT