Beed News Farmer
Beed News Farmer Saam tv
महाराष्ट्र

Beed News: द्राक्ष बाग पाहून शेतकरी ढसाढसा रडले; अवकाळीच्या हाहाकाराने बाग उध्वस्त, स्वप्नांची राखरांगोळी

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. कधी नव्हे तेवढी (Beed News) गारपीट झाली. यामुळे उभी पिकं आडवी झाली. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, भाजीपाला, द्राक्ष बागेचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे पुन्हा एकदा अवकाळीच्या खाईत शेतकरी (farmer) हतबल झाल्याने जगावं कसं? असा प्रश्न शेतकाऱ्यांपुढे उभा आहे. (Breaking Marathi News)

बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या केरुळ गावचे शेतकरी शेख जाकीर यांनी आपल्या ५ एकर शेतामध्ये द्राक्षाची बाग लावली. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली अन मेहनतीला फळही चांगलं आलं. मात्र अवकाळीच्या रूपाने आलेल्या अस्मानी संकटाने सर्व काही हिरावून नेले. द्राक्षाच्या घडाची माती झाली. जवळपास ४० टन द्राक्ष वाया गेल्याने १५ लाखांचे नुकसान झाल्याचं शेतकरी जाकीर शेख यांनी सांगितले.

शेतकरी ढसाढसा रडले

जीवापाड जपलेली द्राक्ष बाग उद्धवस्त झाल्याने शेतकरी जाकीर शेख यांचे भाऊ शब्बीर शेख यांना अश्रू अनावर झाले. ही बाग दोन वर्ष झालं आम्ही सांभाळतोय. दोन वर्षात एक रुपयाही उत्पन्न आलं नाही. आता कुठे द्राक्ष आले होते. पैसे येणार होते, मात्र आता एक रुपयाही पदरात पडणार नाही. यामुळे आम्ही आता काय करावे मायबाप सरकारने आधार द्यावा; असं म्हणत असताना शब्बीर शेख यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले.

चाळीत ठेवलेल्‍या कांद्याचेही नुकसान

अशीच परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची देखील आहे. बीड तालुक्यातील पोखरी घाट येथील कांदा उत्पादक शेतकरी संदिपान झांजुर्णे यांनी कांद्याची लागवड केली होती. हा कांदा चाळीमध्ये ठेवला होता. मात्र या कांदा चाळीवरील सिमेंटच्या पत्र्याला गाराने मोठे मोठे तडे गेल्याने भेगा पडल्या आहेत. यामुळे त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती बीडच्या बेलखंडी पाटोदा या गावातील शेतकऱ्यांची झालीय. शेतातील उभी पिकं आडवी झाली असून गहू, ज्वारी, आंबा, टरबूज यासह भाजीपाल्याचा देखील मोठं नुकसान झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT