Nandurbar News: २६ महिन्‍यांपासून वीजचोरी; २ लाख ३१ हजारांचा दंड करत पोलिसात गुन्‍हा दाखल

२६ महिन्‍यांपासून वीजचोरी; २ लाख ३१ हजारांचा दंड करत पोलिसात गुन्‍हा दाखल
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात वीज चोरीचे प्रकरणात वाढ होत आहेत. असाच प्रकार (Navapur) नवापूर शहरात घडला आहे. दोन लाखाहून अधिकची वीज चोरीची (Electricity Theft) घटना घडली असून थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Live Marathi News)

Nandurbar News
Nitin Deshmukh on CM Shinde : सत्तेत बसलेत यांना लाज वाटली पाहिजे; आमदार नितीन देशमुखांची शिंदे-फडणवीसांवर टीका

नवापूर शहरातील इंद्रिस रज्जाक खाटीक याची इस्त्राईल ऑईल फॅक्टरी आहे. या ऑईल फॅक्टरीत गेल्या २६ महिन्यापासून वीज चोरी करून वापरत होते. एकूण २ लाख ३१ हजार ६४० रुपये किंमतीची १ लाख १० हजार ६४३ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज वसुली सुरू आहे. यासाठी भरारी पथक नेमण्यात आले असून या भरारी पथकाच्या लक्षात आल्यानंतर तपासणी केली असता गेल्या अनेक महिन्यापासून वीज चोरी होत असल्याचे लक्षात आले.

Nandurbar News
Ahmednagar News: अवकाळीने प्रचंड नुकसान; घराचे पत्रे उडून गेल्याने रात्रभर कुटुंब उघड्यावर

महावितरणकडून गुन्‍हा दाखल

इंद्रिस खाटीक यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखीन कुठे विच चोरी होत आहे का? यासाठी आता भरारी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे. यात जो कोणी आढळेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या इशारा देखील महावितरण कंपनीकडून देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com