Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : दोन वर्षांपासून शिक्षक नाही; शाळेला कुलूप ठोकत गावकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Beed News : शाळेमध्ये दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. तर त्या ठिकाणी २०२३ मध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते व आठ शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहेत.

Rajesh Sonwane

योगेश काशीद   
बीड
: जिल्हा परिषद शाळांची अवस्था वाईट असून काही ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसा शिक्षकांचा स्टाफ नाही. अशाच प्रकारे बीडच्या माळापुरी जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेला दोन वर्षांपासून शिक्षक नाही. यामुळे गावकरी संतप्त झाले असून आत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करत शिक्षक नेमणुकीची मागणी केली.  

बीड पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या माळापुरी गावामध्ये जिल्हा परिषदेची उर्दू शाळा आहे. या शाळेमध्ये दीडशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. तर त्या ठिकाणी २०२३ मध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते व आठ शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहेत. मात्र सद्यस्थितीला त्या ठिकाणी पाचच शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने शिक्षकांची संख्या कमी होत आहे.  

दोन वर्षांपासून शिक्षक नाही 

दरम्यान २०२३ पासून शाळेला शिक्षक मिळावा; या मागणीसाठी अनेक वेळा अर्ज देत मागणी केली. मात्र याचा प्रशासनावर काहीही फरक पडला नाही. अर्थात मागणी केल्यानंतर देखील शाळेत नवीन शिक्षक नियुक्ती करण्यात आलेली नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. या विरोधात आज ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. 

जिल्हा परिषदेसमोर आंदोलन 

मागणी केल्यानंतर देखील शिक्षक मिळत नसल्याने नाईलाजाने आज विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषदेच्या पायऱ्यावर येऊन आंदोलन करण्यात आले आहे. शाळेला कुलूप ठोकत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले आहे. जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळत नाही; तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून जाणार नाही अशी ठाम भूमिका माळापुरी ठिकाणच्या पालकांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: 'आम्ही काय बांगड्या घातल्यात का?' महेश लांडगे-अजित पवारांची पुणे-पिंपरीत कुस्ती

Non Acidity Rice Recipe: पित्त न होणारा फोडणीचा भात कसा बनवावा? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

समलिंगी मित्राला भेटायला मुंबईचा व्यापारी आग्र्याला पोहोचला, आधी कारमध्ये भयंकर घडलं, नंतर शेतात नेऊन मित्रांच्या मदतीने...

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: विक्रोळीत शॉपिंग सेंटरला जवळच्या मीटर बॉक्सला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT