Crocodile : सांगलीत भर रस्त्यावर मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये पसरली दहशत, रेस्क्यू करत मगरीला पकडले

Sangli News : धामवडे व परिसरात गेली अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री रस्त्यावरती शुकशुकाट असतो. धामवडे हे गाव डोंगराच्या कपारीत वसलेले गाव आहे. या ठिकाणी नदी नाही, तरीही या भागात मगरीचे दर्शन
Crocodile
Crocodile Saam tv
Published On

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील धामवडे येथील वाहन धारकांना रस्त्यावर मगरीचे दर्शन झाले आहे. अर्थात बिबट्यानंतर आता रस्त्यांवर मगरींचा वावर पाहण्यास मिळत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मगरीला प्राणी मित्राने व ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. परंतु या भागात नदी नाही; तरीही मगर आली कुठून? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोंडाईवाडीचे ग्रामस्थ विश्वास पाटील, सुरेश पाटील, प्रथमेश पाटील हे शिराळाहून शिरसी मार्गे कोंडाजी वाडीकडे निघाले होते. यावेळी त्यांना शिरसी धामवडे या रस्त्यावर बाबासो मस्कर यांच्या घराजवळ मगर रस्त्यावरून जात असताना आढळून आली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना याबाबतची कल्पना दिली. तसेच वन विभागाला देखील याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर लागलीच टीम घटनास्थळी दाखल झाली होती.  

Crocodile
Shirpur Crime News : दिवसभर सोबत फिरल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच केली हत्या

मगरीला पकडून सोडले जंगलात 

दरम्यान धामवडे व परिसरात गेली अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्री या रस्त्यावरती शुकशुकाट असतो. धामवडे हे गाव डोंगराच्या कपारीत वसलेले गाव आहे. या ठिकाणी नदी नाही, तरीही या भागात मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्राणी मित्र आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून जंगलात सोडण्यात आले आहे. 

Crocodile
Heavy Rain : वर्धा, भंडारा, वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; महाराष्ट्र- मध्यप्रदेशचा संपर्क तुटला, वर्ध्यातील रस्तेही वाहतुकीसाठी बंद

महाड तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला
रायगड
: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढली असून डोंगराळ ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार पाहण्यास मिळतो. यातच आंबेशिवथर येथे बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. आंबे शिवथर गावातील शेतकरी संतोष मालुसरे यांच्या गाईच्या वासरावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केला आहे. मालुसरे गुरे चारण्यासाठी रानात गेले असता बिबट्याने हल्ला केला. या वेळी त्यांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याला दगड फेकून मारला. मात्र बिबट्या तेथून जात नसल्याने मालुसरे यांनी दुचाकी चालू करत रेस करीत हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. हॉर्नच्या कर्कष्य आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com