Walmik karad SIT Custody in Beed Sarpanch Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: वाल्मिक कराडचा नवा कारनामा, दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यानंतर बीडमध्येही प्रॉपर्टी

Walmik Karad Wife Jyoti Jadhav Property: तुरूंगामध्ये असलेल्या वाल्मिक कराडचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर पुण्यानंतर बीडमध्येही प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर बीडच्या मांजरसुंबा परिसरात ९ एकर जमीन आहे. या परिसरात वाल्मिक कराडने एकूण ५० एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात आता मांजरसुंबा येथील शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. शेतकरी मुकेश रसाळ यांनी आरोप केला आहे की, 'ज्योती जाधव यांनी त्यांच्या शेतातील मुरुम उपसा करून स्वतःच्या शेतात भरला. जमीन खरेदी केल्यापासूनच आम्हाला त्रास सुरू झाला. आमच्या शेतातील मुरूम उपसा केला. आम्ही प्रशासनाकडे तक्रार दिली होती. पण अजून कोणतीही कारवाई झाली नाही.'

शेतकऱ्यांनी २०२४ च्या जुलै महिन्यापासूनच ज्योती जाधव यांच्याविरोधात प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर आता पुण्यानंतर बीडमध्येही प्रॉपर्टी असल्याचे या घटनेमुळे उघड झाले आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावावर पुण्यामध्ये तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्या नावावर राज्यभरात कुठेकठे प्रॉपर्टी आहे याची माहिती देखील उघड होताना दिसत आहे. बीडमध्ये त्यांच्या नावावर आता जमीन असल्याचे समोर आले आहे. ज्योती जाधव या वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून त्यांना दोन मुलं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT