Beed News  Saam Digital
महाराष्ट्र

Beed News : शिवारात खुरपणीचं काम करताना कोसळली वीज; 3 महिला जागीच ठार, तर एक गंभीर जखमी

Beed Rain News : शिवारात खुरपणीचं काम करताना वीज पडून ३ महिला जागीच ठार झाल्या आहेत, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Sandeep Gawade

बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलंबा गावच्या शिवारात, वीज पडून 3 महिला ठार झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. चकलांबा शिवारात काही महिला खुरपणीचे काम करत होत्या. विजया राधाकिसन खेडकर (वय 45), शालन शेशेराव नजन (वय 55), लंकाबाई हरिभाऊ नजन (वय 42) अशी मृत महिलांची नावं आहेत. तर यमुनाबाई माणिक खेडकर या जखमी झाल्या आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या महिला शेतात खुरपणीच्या कामाला गेल्या होत्या. सायंकाळ झाली होती. हातातील काम आटोपून महिला घरी जाणार होत्या. मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षितस्थळी जाण्याआधीच वीजेने गाठलं. शिवारातचं वीज कोसळली यात 3 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पावसाची दडी, शेतकरी संकटात

चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. सुरवातीच्या पावसानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मागील आठ दहा दिवसांपासून पाऊसच नसल्यानं पेरणी वाया गेली आहे. त्यामुळं शेतक-यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान एक हजार १४० मिमी आहे. मात्र पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पावसानं दगा दिला.

२५ जूनपर्यंत केवळ ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस न आल्याने एकीकडे पेरणीची कामं रखडली आहेत, तर दुसरीकडे ज्यांनी पेरणी केली ती कोंबं कोमेजत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ७५ टक्केच पेरणीची कामं झाली. पण त्यातीलही निम्म्यापेक्षा अधिक पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या. कापूस आणि सोयाबीन या प्रमुख पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. तर धान पऱ्हे करपण्याचा स्थितीत आहेत. येत्या तीन चार दिवसात पाऊस झाला नाही, तर शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम सह रिसोड,मालेगांव तालुक्याला पावसाने झोडपलं

Empty Stomach: रात्री उपाशीपोटी झोपल्याने भोगावे लागतील 'हे' दुष्परिणाम

Dhananjay Munde: राजकीय अस्तित्वासाठी धनंजय मुंडेंची धडपड? स्पेशल रिपोर्ट

DCM Ajit Pawar : अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्गाला 150 कोटींचा बुस्टर डोस; अजित पवारांची मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी भेट

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT