Bhandara News : रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी इसमाचा मृत्यू; आर्थिक मदतीसाठी उपवनसंरक्षक कार्यालयात आणला मृतदेह

Bhandara News : कामे आटोपून दुचाकीने घरी जात असताना खुटसावरी ते गडेगाव डेपो फाट्यादरम्यान असलेल्या चिखली तलावाजवळ रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

शुभम देशमुख 
भंडारा
: कामावरून घरी येत असताना रानडुकराने हल्ला करत एकाला गंभीर जखमी केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना अखेर दहा दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

Bhandara News
Dhule News : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या ३५ बुलेट जप्त; धुळे वाहतूक पोलिसांतर्फे कारवाई

भंडारा (Bhandara) तालुक्यातील खुटसावरी येथील प्रवीण सिताराम वासनिक (वय ५३) असे मृत इसमाचे नाव आहे. प्रवीण वासनिक हे कंपनीत मजूर म्हणून कार्यरत होता. रविवारी कामे आटोपून दुचाकीने घरी जात असताना खुटसावरी ते गडेगाव डेपो फाट्यादरम्यान असलेल्या चिखली तलावाजवळ रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. 

Bhandara News
Marathwada Water Scarcity : पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच; अजूनही १६२८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा

जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर डॉक्टरांनी नागपूर येथे उपचारासाठी नेण्याचे सांगितले. त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २५ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घरची स्थिती बेताची व कमावता इसम मृत पावल्याने त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावला आहे. यामुळे ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह उपवनसंरक्षक कार्यालयात आणून मदतीची मागणी करत आंदोलन केले. तसेच परिवाराला मदत मिळावी यासाठीचे निवेदन देण्यात आले. आर्थिक मदत मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन वनाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com