Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : आश्रम शाळेतील शिक्षक आत्महत्या प्रकरण; धनंजय नागरगोजेच्या न्यायासाठी शिक्षकांचे उपोषण, आत्मदहनाचा दिला इशारा

Beed News : बीडच्या केज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शाळेतील शिक्षकांनी न्याय मिळावा यासाठी आंदोलन पुकारले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यातील आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे या शिक्षकांने अकरा दिवसापूर्वी संस्थाचालक विक्रम मुंडे यांच्या कृष्णा अर्बन बँकेसमोरच गळफास घेत जीवन संपविल्याची घटना घडली होती. मृत शिक्षक नागरगोजे यांना न्याय मिळावा यासाठी त्याच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षकांनी आजपासून बेमुदत उपोषण करण्याचे हत्यार उपसले आहे. 

बीडच्या केज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांनी नागरगोजे यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन पुकारले आहे. शाहू फुले आंबेडकर विना अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे.  त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. जवळपास यामध्ये पन्नास हुन अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे

कुटुंबाला आर्थिक मदत करा 

उपोषणकर्त्यां शिक्षकांनी मागण्यांमध्ये शिक्षकांना तात्काळ अनुदान देण्यात यावे, त्याचबरोबर धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळावा व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. याशिवाय धनंजय नागरगोजे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. त्याचबरोबर त्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी; अशी देखील मागणी या शिक्षकांनी केली आहे.

तर आत्मदहन करणार 

या मागण्या शिक्षकांनी केल्या असून त्यांच्या बेमुदत उपोषणाचा जिल्हाधिकारी कार्यालय समोरचा दुसरा दिवस आहे. तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही; तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. तर १ मे या महाराष्ट्र दिना पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही; तर आम्ही आहेत त्या जागेवर आत्मदहन करणार आहोत; असा इशारा उपोषणाला बसलेल्या शिक्षकांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT