Ambajogai Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai Crime: गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगेतील सव्वालाखाचे दागिने चोरले; अंबाजोगाई बसस्थानकातील घटना

Beed News : दिवाळी असल्याने मार्केट. बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे. या गर्दीत प्रवेश करत हात साफ केला आहे

विनोद जिरे

बीड : दिवाळीचे दिवस असल्याने प्रवास करण्याची संख्या वाढली आहे. यामुळे बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरटे (Crime News) हात साफ करत आहेत. असाच प्रकार (Beed) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बसस्थानकावर घडली असून यात महिलेच्या पर्समधून तब्बल सव्वालाख रुपयांचे दागिने चोरले आहेत. (Latest Marathi News)

दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. भुरट्या चोरी करणारे गर्दीत फिरताना दिसत असून सध्या दिवाळी असल्याने मार्केट. बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गर्दी आहे. या गर्दीत प्रवेश करत हात साफ केला आहे. ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यातील अनेक बसस्थानकावर चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत गर्दीत घुसून चोरटे हात साफ करत आहेत. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाजवळील रोख रक्कम किंवा दागिने चोरीला जात आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॅगेतून चोरले दागिने 

अशीच घटना बीडच्या अंबाजोगाई शहरातील बस स्थानकामध्ये समोर आली. लातूर जिल्ह्यातील मावलगाव येथील शीतल रविशंकर भदाडे या अंबाजोगाई बसस्थानकामध्ये आल्या होत्या. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधील १ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT