Buldhana News: दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खाऊन सरकारचा निषेध; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

Buldhana News : राज्य शासनाकडून जोपर्यन सेवेत कायम करून घेत नाही; तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

संजय जाधव 

बुलढाणा : शासकीय सेवेत कायम करा; या मागणीसाठी आरोग्य विभागातील हजारो कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाासमोर (Buldhana) आंदोलन करित आहे. या दरम्यान अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे आज ठेचा- भाकर खाऊन या कर्मचाऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. (Tajya Batmya)

Buldhana News
Dhule News : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बसचे केले पूजन

कंत्राटी पद्धतीने भरती झालेल्या (Health Workers) आरोग्य कर्मचाऱ्यांचे २५ ऑकटोंबरपासून राज्यात कामबंद आंदोलन सुरु आहे. आंदोलन सुरु असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील हजारो कंत्राटी कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यात आज दिवाळीचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आंदोलनस्थळी वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात ठेचा भाकर खाऊन सरकारचा तीव्र निषेध नोंदविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana News
Saibaba Mandir: शिर्डीचे साई मंदिर सव्वादोन तास राहाणार बंद; मंदिरात लक्ष्मीपूजन व धार्मिक विधी

आंदोलनावर ठाम 
कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलन करत असून राज्य शासनाकडून जोपर्यन सेवेत कायम करून घेत नाही; तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. आज दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com