Buldhana News: १०२ रुग्णवाहिका चालक संपावर; तीन महिन्याचा पगार नसल्याने उपसले हत्यार

Buldhana News : काहींना बारा वर्ष उलटून गेली तरीही त्यांचा पीएफ देण्यात आला नाही. या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे
Buldhana 102 ambulance
Buldhana 102 ambulancesaam tv
Published On

संजय जाधव 

बुलढाणा : मागील तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने रुग्णवाहिका चालकांनी संपाचे हत्यार उपसले (Buldhana) आहे. यात सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील चालकांचा समावेश आहे. चालकांच्या संपामुळे अत्यव्यस्थ रुग्णांना नेण्यासाठी (Ambulance) रुग्णवाहिका मिळत नसल्याची स्थिती बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. (Live Marathi News)

Buldhana 102 ambulance
Nandurbar RTO: आरटीओकडून खाजगी ट्रॅव्हल एजन्सीची तपासणी; जास्तीचे भाडे आकारल्यास कार्यवाही

बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयमधील १०२ या रुग्णवाहिकावरील चालकांनी अचानक संप पुकारला आहे. या चालकांना मागील तीन महिन्यापासून (Ambulance Driver) वेतन न मिळाल्याने तसेच सात वर्षांपासून पीएफ सुद्धा मिळाला नसल्याने त्यांच्या या मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐन दिवाळीत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत आरोग्य सेवा कोलमडली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Buldhana 102 ambulance
Jalna News: जाफ्राबाद तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; राष्ट्रवादीचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

१०२ या रुग्णवाहिका वरील चालक हे रात्रीबेरात्री रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र त्यांना दिवाळी तोंडावर असताना देखील वेतन मिळाले नाही. तर काहींना बारा वर्ष उलटून गेली तरीही त्यांचा पीएफ देण्यात आला नाही. या चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. चालक हे अतिशय तुटपुंजा पगारावर काम करत असताना ते सुद्धा मिळत नसल्याने त्यांनी हा संप पुकारला आणि पगार देण्याची मागणी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com