बीड : सूचना म्हणजे अध्यादेश नसतो, अध्यादेश काढण्यासाठी हरकती मागवले आहेत. १६ तारखेनंतर याविषयी साधक बादक चर्चा होईल. यामुळे मराठा आरक्षणावरून (eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. (Maharashtra News)
ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांवरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Beed) बीडमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या, की एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे मराठा समाजाची दिशा भूल केली? हे सर्व राज्याला माहित आहे. सूचना म्हणजे अध्यादेश नसतो, अध्यादेश काढण्यासाठी हरकती मागवले आहेत. १६ तारखेनंतर याविषयी साधक बादक चर्चा होईल. त्यानंतर (Maratha Aarkshan) आचारसंहिता येईल. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी केवळ धुळफेक करण्याचा प्रयत्न केलाय..
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर छगन भुजबळ यांच्या धमकीविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, की विरोध असू शकतो. एक जरांगेची भूमिका असू शकते अन एक भुजबळांची भूमिका असू शकते. त्या भूमिका दोघांनाही मांडण्याचा वैचारिक स्वातंत्र्य आणि अधिकार आहे. मात्र आपल्या वैचारिक विरोधकांच्या प्रति कुणीही किंवा कदाचित वैचारिक विरोधकांच्या आडून स्वपक्षातले कुणीही अशा प्रकारे एकमेकांना संपवण्याची भाषा करणे वाईट आहे. मात्र अशा भाषा जर मंत्र्यांबद्दल होत असतील तर सामान्य लोकांचं काय? त्यामुळे (Devendra Fadanvis) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांना सुद्धा संरक्षण देण्यात असमर्थ ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.