Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीचा तडाखा; गहू, ज्वारीचे मोठे नुकसान

Nanded News : ११ फेब्रुवारीला सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
Nanded Unseasonal Rain
Nanded Unseasonal RainSaam tv

संजय सूर्यवंशी

नांदेड : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. यात (Nanded) नांदेडच्या उमरी, हिमायतनगर ,तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला असून (Wheat) गहू, ज्वारी आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

Nanded Unseasonal Rain
Nandurbar Railway Station : अयोध्याकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेकीचा प्रकार; रेल्वे प्रशासनाकडून मात्र नकार

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेड जिल्ह्यातील उमरी आणि हिमायतनगर तालुक्याला जोरदार तडाखा दिला आहे. ११ फेब्रुवारीला सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी (Rain) पावसासोबत अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसल्याने गहू आणि ज्वारी आडवी झाली. काढणीला आलेल्या हरभऱ्याचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded Unseasonal Rain
Wardha News : गारपिटीने नुकसानीच्या तक्रारीसंदर्भात तांत्रिक अडचण; प्रशासनाने ऑफलाईन सुविधा केली सुरु

पंचनामे करून मदत द्या 

वादळी वारे आणि गारपिटीमुळे आंबा आणि फळबागांचेही नुकसान झाले. उमरी तालुक्यातील कार्ला, कळगाव, पळसगाव, बितनाळ, हुंडासह अनेक गावातील शेतीचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झाले. तर हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com