Eknath shinde and uddhav thackeray Saam tv
महाराष्ट्र

Beed News: उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू, CM एकनाथ शिंदेंकडून कुटुंबियांना मदतीचा हात

Beed News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांना आधार दिला.

विनोद जिरे

Beed News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिर्घायुष्य लाभावे यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर पायी तिरुपती बालाजीला निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान वाटेतच त्यांना मृत्यूनं गाठलं. सुमंत यांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण रुईकर कुटुंब उघड्यावर पडले होते, ते निराधार झाले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांना आधार दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉल करून रुईकर कुटुंबाला धीर दिला. एकनाथ शिंदेंचे समर्थक बाजीराव चव्हाण यांनी मुलांच्या शिक्षणासह इतर जबाबदारी घेतली. आज घराचे काम पूर्ण केले. मुलांचे शिक्षण, इतर अडचणीत चव्हाण यांनी रुईकर कुटुंबियांना मदत केली. (Political News)

सुमंत रुईकर यांनी सांगितलं की, उद्धव साहेबांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून माझे पती गेले होते. पण त्यांच्याकडून 10 दिवसात फोन आला नाही. इतर कार्यकर्त्यांनी भेट घेतली पण मदत केली नाही. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आज आम्हाला सुखाचा घास मिळाला आहे. बाजीराव चव्हाण हे भावासमान असून त्यांच्यामुळे उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा राहिला.

उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून पती सुमंत रुईकर हे पायी गेले. ते कट्टर शिवसैनिक होते, मात्र त्यांचा प्रवासादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पण उद्धव ठाकरे यांनी 10 दिवस झाले तरी एकही फोन नाही केला, याचं वाईट वाटतं, अशा भावना किर्ती रुईकर यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवाप्रमाने धावून आले. त्यांच्या मदतीमुळे आमजे पुन्हा घर उभे राहिले. माझे पती उद्धव ठाकरे यांच्यासाठी गेले पण मदत एकनाथ शिंदे यांनी केली. जमिनीवर पाय ठेऊन चालणारे नेते आहेत. म्हणून ते आज मुख्यमंत्री आहेत, असं शिंद समर्थक बाजीराव चव्हाण यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT