Nana Patole on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होतील का? नाना पटोले म्हणतात, मोदी है तो मुमकिन है!

Nana Patole on Ajit Pawar: भविष्यात राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा दावा नाना पटोले यांनी आहे.
Ajit Pawar & Nana Patole
Ajit Pawar & Nana PatoleSaam TV
Published On

भुषण शिंदे

Nana Patole News: राज्याच्या राजकारण आगामी काळात मोठे फेरबदल होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्ये केलं आहे. भविष्यात राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असा दावा नाना पटोले (Nana Patole) यांनी आहे.

महाविकास आघाडीत आता मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं चिन्ह आहे. महाविकास आघाडी झाली तर आगामी निवडणुकीत त्याचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विचारला तर तिन्ही पक्षाकडे आपले उमेदवार आहे.

Ajit Pawar & Nana Patole
Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंची सुप्रीम कोर्टात धाव, WFI अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

काँग्रेस लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. आता कोणतीही निवडणून नाही. मात्र जेव्हा निवडणुकी होतील, तेव्हा ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं महाराष्ट्रात यावेळी काँग्रेस नंबर वनचा पक्ष बनेल. काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येतील आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. (Political News)

Ajit Pawar & Nana Patole
Bus Accident Video Viral: बसचा विचित्र अपघात CCTVमध्ये कैद; स्पीड ब्रेकर ओलांडताच घडलं असं काही की सगळ्यांनाच धक्का बसला

अजित पवार मुख्यमंत्री होतील का?

अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होऊ शकतील का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी है तो मुमकिन है. राजकारणात काहीही होऊ शकतं. कोणी इथे मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो.

खारघर घटनेतील नेमका आकडा सरकारने जाहीर करावा

खारघरमध्ये अमित शाहांची एसीमध्ये सोय होती. मात्र 13 कोटी 80 लाख जनतेचे खर्च करताना जनता उन्हात बसली होती. अमित शाहांना उशीर होणार म्हणून 10.30 वाजता चालू होणारा कार्यक्रम हा 11.30 वाजता चालू केला. 12 वाजता पहिला मृत्यू झाला तरीही कार्यक्रम चालू केला, अशी बातमी वाचायला मिळाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं.

सरकार बेशरम आहे. यांना जीव गेला तरी काही फरक पडत नाही. सरकार मृतांचा आकडा 18 दाखवत आहे. मात्र चेंगरा चेंगरी पाहून आकडा मोठा असल्याचं कळतंय. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com