Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंची सुप्रीम कोर्टात धाव, WFI अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Latest News: विनेश फोगटसह 7 महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.
Wrestlers Protest
Wrestlers ProtestSaam Tv
Published On

Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद आता सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मादणीसाठी महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. विनेश फोगटसह 7 महिला कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.

Wrestlers Protest
Nagpur News: हिंगणा MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

या महिला कुस्तीपटूंनी 21 एप्रिल रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीच्या कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. तक्रार दाखल करुनही अद्याप त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या कुस्तीपटूंनी आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Wrestlers Protest
Madhya Pradesh News: कहरचं झाला! घरात लेकीच्या लग्नाची तयारी पण ऐनवेळी आईनेच बांधलं बाशिंग; नेमकं घडलं तरी काय?

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या चौकशी समितीकडून अहवाल मागवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. या अधिकाऱ्याने सांगितले की, 'ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आतापर्यंत सात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्वांची चौकशी केली जात आहे. ठोस पुरावे मिळाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल.', असे देखील त्यांनी सांगितले.

Wrestlers Protest
Kalyan Crime News: आईच्या उपचारासाठी पैशाची गरज, 'त्या' दोघींनी घेतला देहविक्रीचा निर्णय; अखेर कल्याण पोलिसांनी केली सुटका

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी महिला कुस्तीपटू रविवारपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनाला बसल्या आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समितीची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com