Kalyan Crime News: आईच्या उपचारासाठी पैशाची गरज, 'त्या' दोघींनी घेतला देहविक्रीचा निर्णय; अखेर कल्याण पोलिसांनी केली सुटका

Kalyan News Update: दीड लाखात या दोन मुलींचा सौदा करताना दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक करत या पीडित मुलींची सुटका केली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...

Kalyan News: पैशांची गरज काय काय करायला लावते याचे धक्कादायक उदाहरण कल्याणमध्ये (Kalyan) समोर आले आहे. दोन मुलींना पैशांची गरज होती. कुणी मदत करायला तयार नाही अखेर या दोन मुलींनी स्वतःला देहव्यापारात ढकलन्याचा निर्णय घेतल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड लाखात या दोन मुलींचा सौदा करताना दोन महिला दलालांना पोलिसांनी अटक करत या पीडित मुलींची सुटका केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू.. (Latest Marathi News)

Crime News
Nagpur News: हिंगणा MIDCमध्ये कंपनीला भीषण आग; 2 कामगारांचा मृत्यू, 20 ते 30 जण अडकल्याची शक्यता

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे एएचटी एसचे अधिकारी महेश पाटील यांना दोन महिला ग्राहकांच्या शोधात असल्याची माहिती मिळाली होती. त्या कल्याणमधील एका लॉजवर येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी खोटे ग्राहक तयार करत लॉजमध्ये सापळा रचला. या लॉजवरून एका तरुणीसह एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. तर या दोघींना देह व्यापार करण्यास भाग पाडणाऱ्या अंजू शिसोदिया व सरिता शिसोदिया या दोन महिला दलालांना अटक केली.

Crime News
Crime News Ambernath : बाबा आईला सोडा...; मुलानेच केली बापाची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

समोर आली धक्कादायक माहिती...

यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, यामधील एक अल्पवयीन पीडित मुलगी ही मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील असून तिची आई आजारी आहे आईच्या उपचारासाठी तिला दीड लाखांची गरज होती. तिने अनेक ठिकाणी मदत मागितली मात्र मदत मिळाली नाही. त्यामुळे अखेर तिने महिला दलालाला संपर्क साधला.

या महिला दलालाने तिच्या मजबुरीचा फायदा घेतला. या पीडित अल्पवयीन मुलीसह या महिला दलालांनी आणखी एका मुलीला देखील आपल्या जाळ्यात ओढलं होतं. या दोन्ही महिला दलाल सध्या पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com