Madhya Pradesh Child Marriage News: मुलीच्या लग्नाची (Wedding) धामधुम सुरू असताना अगदी शेवटच्या क्षणी पोलिसांची एन्ट्री झाल्याने चक्क आईचं नवरी बनून लग्नासाठी तयार झाल्याची धक्कादायक आणि तितकीच चकित करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू... (Latest Marathi News)
याबाबत समोर आलेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आगर माळवा जिल्ह्यात एका महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवले होते. त्यासाठी ती महिला सुसनेर पोलीस स्टेशन हद्दीतील मेहंदी गावात तिचे वडील आणि भावासह अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यासाठी जात होती. मात्र, पतीला मात्र हे लग्न मान्य नव्हते त्याने पोलिसांत पत्नीची तक्रार दिली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू होती.पोलीस आल्याची खबर महिलेला मिळताच तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी योजना आखली आणि नववधूचा पोशाख करून ती मंडपात जाऊन बसली. पण, महिलेच्या पतीने तिचा हा प्लॅनही उधळून लावला.
या सगळ्या नाट्यानंतर महिलेला पोलिस (Police) ठाण्यात नेण्यात आलं व अल्पवयीन मुलीचा बालविवाह (Child Marriage) थांबण्यात आला. या सगळ्या प्रकरणात महिलेला साथ देणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलीच्या मामालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणात कोण कोण सामील होतं याची चौकशी पोलिस करत असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.