Beed Rain Saam tv
महाराष्ट्र

Beed Rain : सरस्वती नदीला पुन्हा पूर; कोथाळा- सिरसाळा गावांचा संपर्क तुटला

Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मागील आठवड्यात देखील मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात मध्यरात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील नाल्यांना व नदीला पूर आला आहे. दरम्यान कोथाळा येथील सरस्वती नदीला पुन्हा एकदा पूर आला असून कोथाळा- सिरसाळा गावांचा संपर्क तुटला आहे.  

बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मागील आठवड्यात देखील मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचे आगमन झाले. जोरदार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Heavy Rain) दरम्यान सरस्वती नदीला पुन्हा पूर आला आहे. यामुळे कोथाळा- सिरसाळा या दोन गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांचा पुराच्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. 

पिकांच्या वाढीस मदत 

दरम्यान पहिला पाऊस (Rain) झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करून टाकली होती. आता हा पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी व कापूस लागवड केली असल्याने सोयाबीन, कापूस, मुग, उडीद या पिकाला पावसामुळे चाल येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! लोकल रेल्वेच्या वाहतूक वेळेत बदल; या मार्गांवर असणार मेगा ब्लॉक

National Flower Lotus: फक्त भारत नाही 'या' देशांचही आहे कमळ राष्ट्रीय फूल

Maharashtra Live News Update: अखेर अकोट नगरपालिकेत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा स्वतंत्र गट

SCROLL FOR NEXT