Buldhana News : फवारणी करताच फुलकोबीचे नुकसान; कृषी केंद्र संचालकांनी दिले मुदत संपलेली औषधी

Buldhana news : फुलकोबीची लागवड केली होती. मात्र त्यावर फवारणी करतेवेळी दुकानदार यांनी त्यांनी वैधता संपलेले औषधी दिल्याने फुलकोबी खराब झाली
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : शेतात लागवड करण्यात आलेल्या फुलकोबीवर शेतकऱ्याने फवारणी केली. मात्र यानंतर या पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी पती- पत्नीने कृषी केंद्र चालकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. 

Buldhana News
Sambhajinagar News : लग्नाला दीड महिना झाला असतानाच काळाची झडप; शेती मशागत करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू

बुलढाणा (Buldhana) जिह्यातील मेहकर तालुक्यातील थार येथील दादाराव वानखेडे यांनी त्यांच्या शेतात फुलकोबीची लागवड केली होती. मात्र त्यावर फवारणी करतेवेळी दुकानदार यांनी त्यांनी वैधता संपलेले औषधी दिल्याने फुलकोबी खराब झाली. परिणामी त्यांचे जवळपास ७ लाखांचे नुकसान झाले. यासंदर्भात कृषी विभागाने सुद्धां पंचनामा केला असून वरिष्ठाकडे अहवाल सादर केला. मात्र त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.

Buldhana News
Amravati News : दुधाच्या कॅनमध्ये चक्क गुरांच्या पानवठ्यामधले पाणी; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार

नुकसान भरपाई मिळावी यासाठी पती- पत्नीचे उपोषणबुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील थार येथील भाजीपाला उत्पादक (Farmer) शेतकरी दादाराव वानखेडे आणि त्यांच्या पत्नी जिल्हाधिकारी कर्यालयसमोर मागील चार दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com