Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; केजमध्ये रिपाईचा विराट मोर्चा

Beed News : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या; केजमध्ये रिपाईचा विराट मोर्चा

विनोद जिरे

बीड : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी (RPI) रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली (Beed) बीडच्या केज शहरात रिपाईचा भव्य मोर्चा निघाला. या मोर्चात हजारो रिपाई कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले आहेत. (Live Marathi News)

रिपाईतर्फे विविध मागण्यांसाठी केजमध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक, बस स्टँड, कानडी चौक, कळंब चौक मार्गे तहसील कार्यालयावर (Maratha Aarkshan) धडकणार आहे.

या आहेत मागण्या 

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, १९९० च्या गायरान जमिनी नियमाकुल करण्याच्या शासनाच्या निर्णयाला २००५ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांचे करण्यात येणारे खाजगीकरण रद्द करण्यात यावे व विद्यार्थी पटसंख्येची अट रद्द करून ज्या त्या शाळांवर शिक्षक नियुक्त करण्यात यावे. शहरातील झोपडपट्टी वासियांना कबाला पावत्या देण्यात याव्यात. केज तालुक्यातील दलित बांधवांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. राज्य शासनाकडून विविध कार्यालयात करण्यात येणारी कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT