Beed News Saam t v
महाराष्ट्र

Beed News : सरकार विरोधात संगणक परिचारक आक्रमक; परळीत शासन निर्णयाची केली होळी

Beed News : परिचालकांची नियुक्ती महाआयटीकडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला; असा आरोप करण्यात आला

विनोद जिरे

बीड : शासनाने संगणक परिचालकांसाठी नवीन निर्णय काढला आहे. याला विरोध करत बीडच्या परळीमध्ये सरकार विरोधात संगणक परिचारक आक्रमक झाले आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची संगणक परिचारकांनी होळी केली आहे.

संगणक परिचालकांबाबतच्या १९ जून २०१४ ला नवीन शासन निर्णयानुसार संगणक परिचालकांची नियुक्ती (Beed) महाआयटीकडून करून पुन्हा एकदा प्रकल्पात भष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना काम देण्याचा घाट शासनाने घातला; असा आरोप करण्यात आला. या शासन निर्णयाला संगणक परिचकलांचा विरोध आहे. या विरोधात परळीत (Parali) आंदोलन करत शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

शासन निर्णयाची केली होळी 

तसेच ३ हजार रुपये मानधनवाढ हि पंधराव्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे; ही मागणी घेऊन आज परळी पंचायत समिती कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करत संगणक परीचारकांनी आंदोलन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hacks : कडाक्याच्या थंडीतही स्वेटरशिवाय शरीर राहील उबदार, थंडीला पळवून लावतील 'या' ५ भन्नाट ट्रिक्स

मोदींचा विरोधकांवर थेट हल्ला! ३० तारखेला संसदेत नेमकं काय घडणार? महिला आरक्षणावरून दिल्लीत मोठा भूकंप!

Maharashtra News Live Update : मोदी सरकार आणत असलेले डिलिमिटेशन लोकशाहीसाठी घातक

तरुणींना आवडतील अशा ५ मॉडर्न साड्या, सौंदर्य पाहतच राहाल

Health Tips : ऑलिव्ह ऑईल रोज खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

SCROLL FOR NEXT