Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: पोलिसांची जुगार अड्डयावर धाड; २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांची जुगार अड्डयावर धाड; २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

विनोद जिरे

बीड : अक्षय तृतीयाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असतो. यानुसार बीडच्या (Beed) माळस जवळा गावात पोलीसांनी (Police) जुगार अड्डयावर धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ७ जणांना अटक केली आहे. (Breaking Marathi News)

बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माळस जवळा फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये २ लाख १८ हजारांच्या मुद्देमाल जप्‍त केला आहे. माळस जवळा फाट्यावर हॉटेलच्या शेजारी खुल्या छपरामध्ये नितीन चिंतामण खांडे यांच्या मालकीच्या (Gambling Den) जुगाराच्या अड्ड्यावर हा छापा मारण्यात आला.

७ जणांना अटक

पोलिसांनी केलेल्‍या या कारवाईत ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. यात शेख शकीर शेख दगडू (रा. पिंपळनेर), नितीन चिंतामण खांडे (रा. पिंपळगाव), दिनकर सुदाम माने (रा. पिंपळगाव), दत्तू दुधाची पवार (रा. गंगनाथवाडी), प्रकाश मोतीराम कानडे (रा. रजाकपूर), सय्यद अफसर अब्दुल (रा. माळस जवळा), विठ्ठल साहेबराव कानडे (रा. रजाकपूर) असे पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक! जखमी कुत्र्याला वाचवायला तरूणी कारमधून उतरली, नराधमाने दोनवेळा विनयभंग केला

Governor of Maharashtra : आचार्य देवव्रत झाले महाराष्ट्राचे राज्यपाल, संस्कृत भाषेतून घेतली शपथ

Maharashtra Weather: पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Live News Update: घाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली

भेंडीच्या भाजीमध्ये मीठ कधी घालावं? योग्य वेळी न टाकल्यास चव बिघडेल

SCROLL FOR NEXT