Sambhaji Nagar Crime: शरीरसुखाची मागणी करत महिलेला बेदम मारहाण; राजकीय नेत्याविरोधात गुन्हा दाखल

शरीरसुखाची मागणी करत महिलेला बेदम मारहाण; राजकीय नेत्याविरोधात गुन्हा दाखल
Sambhaji Nagar Crime
Sambhaji Nagar CrimeSaam tv

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : माझ्यासोबतच शारीरिक संबंध ठेव, अन्यथा तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर (Sambhaji Nagar) चारचाकी गाडीतच बेदम मारहाण झाल्याचा प्रकार लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला गेटजवळ घडला. या प्रकरणात छावणी (Police) पोलिस ठाण्यात राजकीय नेत्‍याविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. (Tajya Batmya)

Sambhaji Nagar Crime
Accident News: मुंबई– पुणे एक्स्प्रेसवेवर बस, ट्रकचा अपघात; चार जण जखमी

छत्रपती संभाजीनगरमधील लक्ष्‍मी कॉलनीतील बारापुल्‍ला गेटजवळ घडलेल्‍या या धक्‍कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जयकिशन कांबळे याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कांबळे याने महिलेला त्रास देत शरीरसुखाची मागणी केली. याला विरोध केल्‍याने महिलेला बेदम मारहाण केल्‍याची नोंद महिलेने पोलिसात दिलेल्‍या फिर्यादीमध्‍ये आहे.

Sambhaji Nagar Crime
Jalgaon News: भावी पत्‍नीशी व्हिडिओ कॉलवर बोलतच घेतला गळफास; पुढच्‍या महिन्‍यात होते लग्‍न

बलात्‍काराचा गुन्‍हाही दाखल

दरम्यान आरोपी जयकिशन कांबळे हा एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता. त्याच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा (Crime News) गुन्हा दाखल झाला होता. त्याप्रकरणात अटक झाल्यानंतर कांबळे हा जामिनावर सुटलेला आहे. बलात्काराचा गुन्हा नोंदविताच संबंधित पक्षाने हकालपट्टी करणारे पत्रही काढले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com