beed news Saam TV
महाराष्ट्र

Beed News: बीडकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात झपाट्याने कमी होतोय पाणीसाठा; धरणात केवळ इतकाच पाणीसाठा

बीड जिल्ह्यात पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे बीडकरांची चिंता वाढली आहे.

विनोद जिरे

Beed News: बीड जिल्ह्यात पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे बीडकरांची चिंता वाढली आहे. बीडमध्ये मध्यम लघु 144 प्रकल्पात आजघडीला 30 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बीडकरांची पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यातील 50 धरणे हे ज्योत्याखाली असल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही, मात्र तरीही पाणीबाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. मे च्या पहिल्या आठवडयात जिल्ह्याचा पाणीसाठा एवढ्या पावसानंतर ही 30 टक्क्यांच्या घरात आढळून येतो. यावर्षी पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तसे झाले तर अनेक गावांना पाणी टंचाईच्या संकटाना सामोरे जावे लागणार आहे.

जिल्ह्यातील लहान-मोठया १४४ धारणांपैकी केवळ ९ धरणे हे अर्ध्याच्यावर भरलेले आहेत. तर २५ ते ५० टक्यांच्यामध्ये पाणीसाठा असणाऱ्या धरणांची संख्या ३१ च्या घरात असून २५ टक्यांच्या खाली ५३ धरणांमध्ये पाणी आढळून येते. दरम्यान ४५ प्रकल्प ज्योत्याखाली असून ५ प्रकल्प मृत साठयात आहेत.

पावसाळा लांबणीवर गेला तर...

बीड जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बीडकरांना पाणी समस्येचा मोठा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकासाठी देखील कमी पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worst foods to eat with eggs: चुकूनही अंड्यासोबत हे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खाऊ नका

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT