Narhari Zirwal On Shinde Group Mla : राज्यातील सत्तासंघर्षावर १४ मे आधी सुप्रीम कोर्ट आपला निकाल देऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र ठरवलं होतं. घटनापीठाने हे प्रकरण माझ्याकडे सोपवल्यास १६ आमदार अपात्र होतील, असं नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.
१६ आमदारांचं प्रकरण तुमच्याकडे आले तर काय होणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले की, ''मी त्यांना इथून अपात्र म्हणून पाठवलं आहे. माझ्याकडे हे प्रकरण आलं तर ते अपात्र होती.'' (Breaking Marathi News)
सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर बोलताना ते सांगता येणार नाही, निकाल आल्यावरच कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. घटनापीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. आता हा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. निकाल लवकरच लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची धाकधूक वाढली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.