Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता; कधी, कुठे आणि केव्हा? वाचा

हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
Rain Update
Rain Update Saam Tv

Mumbai News: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसामुळे याआधीच शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झालं आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबात पट्टा तयार होत आहे. त्यामुळे आज मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. या मोचा वादळाच्या परिणामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Rain Update
Selfie With President Helicopter: राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढणं पडलं महागात, अधिकाऱ्याला गमवावी लागली सरकारी नोकरी

मोचा चक्रिवादळामुळे देशातील इतर राज्यासहित महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अति पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागात पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजांची चिंता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी के. एस. होसाळीकर यांनी इशारा दिला होता. के. एस. होसाळीकर यांनी सांगितले होते की, 'प. बंगाल उपसागर,द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तर ९मे पर्यंत अजून तीव्र (depression) होण्याची शक्यता आहे'.

'याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन पुढे बंगाल उपसागरापासून उत्तरेकडे प्रवास सुरू होईल. तर अंदमान,निकोबारला ८-१२ मे पर्यंत या भागात मुसळधार-अती मुसळधार पाऊस,समुद्र खवळलेला ,वादळी वारे असतील, असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.

दरम्यान, या कालावधित समुद्र खळवलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांना आणि पर्यटकांनाही समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे. तर समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com