Laxman Hake hunger Strike Protest:  Saamtv
महाराष्ट्र

OBC Protest Beed: 'विधानसभा निवडणुकीत नेत्यांना गावबंदी करू', बीडमध्ये ओबीसी बांधव आक्रमक; मुंडन करून केला सरकारचा निषेध |VIDEO

Laxman Hake hunger Strike Protest: काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती. त्यानंतर ओबीसी शिष्टमंडळाचीही सरकारसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विनोद जिरे

बीड, ता. २२ जून २०२४

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये', या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा दहावा दिवस असून राज्यभरातील ओबीसी बांधवांचा लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. बीडच्या खिळदमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून मुंडन करत त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

एकीकडे आरक्षणाच्या संरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले असतानाच बीडच्या खळद गावात गेल्या तीन दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे म्हणून गावकरी उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने गावकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आज लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी आंदोलकांनी मुंडन आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच बोगस कुणबी नोंदी रद्द करून लक्ष्मण हाकेंच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा विधानसभा निवडणुकीत देखील नेत्यांना गावबंदी करू, असा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.

दरम्यान, काल राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांची भेट घेतली होती. त्यानंतर ओबीसी शिष्टमंडळाचीही सरकारसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज राज्य आज शिष्ट मंडळ दुपारी दोन वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे. मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपिचंद पडळकर, मंत्री गुलाबराव पाटील हे या शिष्टमंडळामध्ये असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava For Health : प्रत्येक महिलेने खायला हवे हे एक फळ, त्वचा तर चमकदार होईलच रोगप्रतिकार शक्तीही वाढेल

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

SCROLL FOR NEXT