Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : तलावात बैल धुण्यासाठी गेलेला शेतकरी घरी परतलाच नाही; बैलपोळ्यादिवशी शेतकऱ्याच्या कुटुंबावर घाला

Beed News : बीडच्या तालुक्यातील भेंड टाकळी गावात बैलपोळ्याच्या दिवशीच शेतकरी बिभीषण लोंढे बैलांना स्नान घालण्यासाठी घेऊन गेले असता परत घरी आलेच नाही. २४ तास उलटूनही या प्रकरणी शोधमोहीम सुरु आहे.

Alisha Khedekar

  • बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बिभीषण लोंढे तलावात बुडून मृत्यूमुखी

  • एनडीआरएफच्या तीन पथकांकडून २४ तास शोधमोहीम राबवली

  • भेंड टाकळी गावात शोककळा पसरली, सणाचे वातावरण शोकांतिकेत बदलले

  • ग्रामीण भागातील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात बैलपोळ्याच्या दिवशीच दुर्दैवी घटना घडली आहे. पारंपरिक सण म्हणून साजरा होणाऱ्या बैलपोळ्यादिवशी गावोगावी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालून, सजवून आणि त्यांची पूजा करून बैलपोळा साजरा करतात. मात्र, एका शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा सण शोकांतिकेत बदलला. गावातील तलावात आपल्या बैलांना स्नान घालण्यासाठी गेलेल्या बिभीषण सुदाम लोंढे (वय ५३) या शेतकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन बुडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड मधील गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी गावात राहणारे बिभीषण लोंढे आपल्या बैलांना घेऊन स्नान घालण्यासाठी तलावावर गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. लोंढे घरी परतले नाहीत म्हणून तात्काळ गावकऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, पाण्याचा वेग व खोली लक्षात घेता शोधकार्य अवघड बनले. त्यामुळे तत्काळ एनडीआरएफच्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले.

एनडीआरएफच्या तीन पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले. जवळपास २४ तासांपासून हे शोधकार्य अखंड सुरू होते. दिवसभर शोध घेतल्यानंतर संध्याकाळी काही काळ मृतदेह शोधण्यात आला होता, पण रात्री अंधार आणि तांत्रिक अडचणीमुळे शोधकार्य थांबवावे लागले. मध्यरात्रीनंतर पथकांना अंधारामुळे तलावातील कार्यवाही थांबवून गावात परतावे लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार बैल धुण्यासाठी गेलेल्या लोंढे यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. बैलपोळ्यासारख्या सणाच्या दिवशी शेतकऱ्याच्या मृत्यूने वातावरण शोकाकुल झाले आहे.

या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकंदरीत, बैलपोळ्यासारख्या आनंदी सणावर काळाचा घाला घालत बिभीषण लोंढे यांचा मृत्यू झाल्याने भेंड टाकळी गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : ड्युटीवर असताना छातीत दुखू लागलं, पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shreya Bugde: लाल साडीत खुलून दिसतेय श्रेया बुगडे

Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Hartalika Vrat 2025: हरतालिका व्रताच्या दिवशी 'या' गोष्टी दान करा, मिळेल दुप्पट पुण्यफळ

Paneer Chilli: रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT