Nagpur Goa Highway Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Goa Highway : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेकापचा विरोध; बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ न देण्याचा दिला इशारा

Beed News : गोव्यापासून ते नागपूरपर्यंत तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जात आहेत

विनोद जिरे

बीड : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्यास शेकापने विरोध केला आहे. हा महामार्ग रद्द करावा, ही मागणी घेऊन (Beed) बीडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. अगोदर संघर्ष समितीच्या २२ मागण्या पूर्ण करा. तेव्हाच महामार्गाचे काम सुरू करा. अन्यथा बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ देणार नाही; असा इशारा (Farmer) शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिला. (Maharashtra News)

नागपूर (Nagpur) गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तिपीठ महामार्ग बाधीत १२ जिल्ह्यामध्ये बाधीत शेतकरी संपर्क संवाद दौरा सुरू आहे. त्या निमित्ताने ते आज बीड जिल्ह्यात आले असून महामार्ग होऊ देणार नाहीत; असा इशारा भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोव्यापासून ते नागपूरपर्यंत तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग केला जात आहे. हा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या जात आहेत. या बदल्यात त्याचा मोबदला कमी दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असल्याने याला तीव्र विरोध केला जात आहे. दरम्यान यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशा घोषणाबाजी देखील करण्यात आल्या. तसेच सक्तीने भूसंपादन करणार असाल तर २२ मागण्या पूर्ण करा. तेव्हाच महामार्गाचे काम सुरू करा. अन्यथा बीड जिल्ह्यात महामार्ग होऊ देणार नाही; असा इशारा देखील देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT