Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Asian Games cricket 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारत-अफगाणिस्तान क्वार्टर फायनल सामना पावसामुळे रद्द झाला. टॉसही होऊ शकला नाही. उच्च ICC क्रमवारीच्या आधारावर भारताने थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.
Asian Games 2026
Asian Games 2026saam tv
Published On: 

Cricket News Marathi: आयची-नागोया एशियन गेम्स 2026 मधील पुरुष क्रिकेट स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्वार्टर फायनल सामना पावसामुळे होऊ शकला नाही. सोमवारी निशिनच्या कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना होणार होता. मात्र पावसामुळे मैदान ओले झाले होते. त्यामुळे सामना सुरू होण्याआधीच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात टॉसही झाला नाही.

सामना रद्द झाल्याने टीम इंडियाचा फायदा झाला आहे. भारताने चांगल्या रँकिंगच्या आधारावर थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सध्या आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे. आता टीम इंडियाचा सेमीफायनल सामना 1 ऑक्टोबरला याच मैदानावर होणार आहे.

Asian Games 2026
Virat Kohli: 'भारतासाठी हा माझा शेवटचा वर्ल्डकप…’; विराटच्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, रोहितनेही सांगितला प्लान

भारताचा सेमीफायनलमध्ये कोणाशी सामना?

सेमीफायनलमध्ये भारताचा सामना श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील क्वार्टर फायनल सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातील सामना 29 सप्टेंबरला होणार आहे. याआधी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील क्वार्टर फायनल सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे चांगल्या रँकिंगच्या आधारावर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाला. पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये सामना बांगलादेश आणि मलेशिया यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे.

कोणत्या टी थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश?

एशियन गेम्सच्या पुरुष क्रिकेट स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार टीम्सना थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तर नेपाळ, जपान, अफगाणिस्तान, हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान या टीम्सना आधी ग्रुप स्टेजचे सामने खेळावे लागले.

ग्रुप-ए मधून नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तर ग्रुप-बी मधून मलेशिया आणि हाँगकाँग यांनी अंतिम आठमध्ये स्थान मिळवले.

Asian Games 2026
किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम उद्धवस्त

क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक

  • 28 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, सामना रद्द

  • 28 सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सामना रद्द

  • 29 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध नेपाळ, सकाळी 5.30 वाजता

  • 29 सप्टेंबर- बांगलादेश विरुद्ध मलेशिया, सकाळी 10 वाजता

  • 1 ऑक्टोबर- पहिला सेमीफायनल, पाकिस्तान विरुद्ध TBC, सकाळी 5.30 वाजता

  • 1 ऑक्टोबर- दुसरा सेमीफायनल, भारत विरुद्ध TBC, सकाळी 10 वाजता

  • 3 ऑक्टोबर- ब्रॉन्ज मेडल , सकाळी 5.30 वाजता

  • 3 ऑक्टोबर- फायनल (गोल्ड मेडल सामना) सकाळी 10 वाजता

पाकिस्तानचीही सेमीफायनलमध्ये धडक

जपानमधील निशिनमध्ये कोरोई स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पहिल्या पुरुष क्रिकेट क्वार्टर-फायनल सामन्यात पाकिस्तानची टीम मैदानात न उतरताही थेट सेमीफायनलमध्ये पोहोचलीये. सोमवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात खेळवला जाणारा सामना सततच्या पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला.

Asian Games 2026
IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

आयसीसी रँकिंग पाकिस्तानसाठी ठरली वरदान

सामना रद्द झाल्यानंतर आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या नियमानुसार, पाकिस्तानला विजेता घोषित करण्यात आलं आणि त्यांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या टीम्सना त्यांच्या उच्च आंतरराष्ट्रीय क्रमवारीच्या आधारे थेट क्वार्टर-फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com