Majalgaon Nagarparishad Saam tv
महाराष्ट्र

Beed News : माजलगाव नगरपालिका १० दिवसांपासून बंदच; जाळपोळीचा पंचनामा झाला नसल्याने कामे रखडली

Beed News : आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ केल्यानंतर माजलगाव नगरपालिका कार्यालय देखील पेटविले होते

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंनदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ केली होती. यात (Beed) बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेत देखील (Maratha Aarkshan) जाळपोळ झाली होती. तेव्हापासून म्हणजे मागील १० दिवसांपासून नगरपरिषदेचे कामकाज अजूनही बंदच आहे. परिणामी सर्व कामे रखडलेली आहेत. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यात काही आंदोलकांच्या वतीने तॊडफॊड करत आंदोलनाला हिंसक वळण दिले होते. यामध्ये आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ केल्यानंतर माजलगाव नगरपालिका कार्यालय देखील पेटविले होते. या घटनेला १० दिवस उलटले असून यानंतर अद्याप येथील कामकाज नव्याने सुरु झालेले नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंचनामा करण्यासच उशीर 

मराठा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेत (Majalgaon) जाळपोळ करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी अद्याप घटनेचा पंचनामा केला नसल्याने नगरपालिका कार्यालय बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची काम रखडली आहेत. त्यामुळे रहिवासी प्रमाणपत्र, पीटीआर, जन्म मृत्यूची नोंद बांधकाम परवाना यासह अनेक काम रखडली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT