Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : महावितरणच्या कर्मचाऱ्यास कंत्राटदाराकडून मारहाण; बीडच्या पाटोदा येथील प्रकार, कार्यालयात केली तोडफोड

Beed News : झाडं तोडणीच्या कामाची माहिती दिल्यामुळे आमचे बिल थकले आहे; असे म्हणत शिवीगाळ करून लाईनमन यांना बेदम मारहाण करण्यात आले आहे. यामध्ये लाईनमन नाईकनवरे हे जखमी झाले आहेत.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : महावितरणकडून कामाचा ठेका देण्यात आलेल्या कंत्राटदाराची मुजोरी पाहण्यास मिळाली आहे. कंत्राटदाराने थेट महावितरणच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यास मारहाण केली. इतकेच नाही तर कार्यालयातील संगणक, खुर्च्यांसह साहित्याची तोडफोड देखील केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या विरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. 

बीडच्या पाटोदा येथील महावितरण कार्यालयात हा प्रकार घडला आहे. कार्यालयात असलेले लाईनमन किरण नाईकनवरे यांना कंत्राटदार राहील सलीम शेख याने वडील व भाऊला सोबत घेत मारहाण केली आहे. झाडं तोडणीच्या कामाची माहिती दिल्यामुळे आमचे बिल थकले आहे; असे म्हणत शिवीगाळ करून महावितरण लाईनमन यांना बेदम मारहाण करण्यात आले आहे. यामध्ये लाईनमन नाईकनवरे हे जखमी झाले आहेत. 

साहित्याची केली तोडफोड 

लाईनमन नाईक नवरे यांनी सदरील कंत्राटदाराच्या विरोधामध्ये चुकीचे काम केल्याप्रकरणी अहवाल पाठवत असताना दिलेल्या माहितीचा राग मनात धरून कंत्राटदाराकडून लाईनमन यांना मारहाण करण्यात आली. तसेच कार्यालयातील साहित्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मारहाणीत जखमी झाल्यानंतर पाटोदा पोलिस ठाण्यात तक्रार देऊन वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना दुसऱ्यांदा शेख यांनी मारहाण केली.

महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे महावितरणचे कर्मचारी संतप्त झाले होते. यानंतर आरोपीवर कारवाईच्या मागणीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बाजारतळ परिसरात रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन केले. आक्रमक कर्मचाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून कंत्राटदाराला अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. यामुळे वातावरण तापले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra News Live Update: अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळेकर नागरिकांनी सोन चांदी खरेदी करण्याचा लुटला आनंद

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

SCROLL FOR NEXT