Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : मतमोजणी ठिकाणी तांत्रिक वस्तू आढळल्यास कारवाई; अँड्रॉइड मोबाईल घड्याळ वापरण्यास बंदी

Beed News : देशातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता सर्वाना वेध लागले आहेत निकालाचे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होत असून जिल्हा प्रशासनाची यासाठीची सर्व तयारी झाली आहे

विनोद जिरे

बीड : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होणार आहे. बीडमध्ये ही मतमोजणी बीड शहरालगत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन येथे होत आहे. या मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल घडी वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. तसे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

देशातील (Lok Sabha Election) लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता सर्वाना वेध लागले आहेत निकालाचे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जूनला होत असून (Beed) जिल्हा प्रशासनाची यासाठीची सर्व तयारी झाली आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मतमोजणी अधिकारी-  कर्मचारी, सुपरवायझर, सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, उमेदवारांचे नेमलेले प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची मनाई आहे. यासह अँड्रॉइड मोबाईल घड्याळ मोबाईलच्या (Mobile) पद्धतीने चालविली जाते असे कुठल्याही तांत्रिक उपकरणे सोबत ठेवण्याची ही बंदी असेल.

तर थेट कारवाईचे निर्देश 
मतमोजणी होणार असलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या तांत्रिक वस्तू वापरास बंदी असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तर या तांत्रिक वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी वापरण्यात आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल; असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खासदार पार्थ पवार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबईत २६४० घरांची निघाली लॉटरी, हक्काच्या घरासाठी कसा कराल अर्ज? किती असेल किंमत? वाचा A टू Z माहिती

खेळता खेळता 6 वर्षाच्या चिमुकल्याने लोहचुंबक गिळला; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता वाचवला जीव

Bank Holiday: राज्यात बँकांना सलग ६ दिवस सुट्ट्या; महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा सुट्ट्यांची यादी

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

SCROLL FOR NEXT