Beed Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Beed Heavy Rain : अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोडले कंबरडे; सोयाबीन, कापूस पीक पाण्याखाली, बीड जिल्ह्यात प्रचंड नुकसान

Beed News : गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी ने शेतकऱ्याचा हातातून अशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर आजही शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे. यात सोयाबीन पूर्ण गेला आहे. केलेला खर्चही निघणार नाही

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून या मुसळधार पावसांत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचेअक्षरशः कंबरडे मोडले आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गाव परिसरातील शेतामध्ये आजही गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे पूर्ण पीक जळून गेले असून यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती हजारो शेतकऱ्यांची आहे. 

राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना शेतकरी पुरता खचून गेला आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या स्वप्नाची माती केली आहे. खरीप पिकातील नगदी पीक सोयाबीन व कापूस पाणी लागल्याने जळून गेला आहे. त्यामुळे केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

सोयाबीनसह कापसाचे नुकसान 

सोयाबीन बरोबरच कापूस उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. केलेला खर्चही निघणार नसल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देणे गरजेचे आहे. गावातील खंडू कदम या शेतकऱ्याने आठ एकर वर कपाशी लागवड केली पण आठ दिवसापासून लागू राहिलेल्या पावसामुळे पाच एकर कपाशी पाण्याने पूर्ण केली आहे त्यामुळे आता काय करायचं असं सवाल या शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. माजलगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. गोदावरी, सिंदफना आणि सरस्वती नदीच्या पुरामुळे शेकडो एकर वरील शेती पाण्याखाली गेली. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धीर देऊन त्यांच्या अश्रू असावेत अशी मागणी होत आहे.

सरकारला आर्त हाक 

कोथरूड गावातील महिला शेतकरी कांताबाई कदम यांची हाक सरकार ऐकणार आहे का? शेतातलं सगळं वाहून गेलं मुख्यमंत्री साहेब; मुलांचे शिक्षण कशी करायची? असा सवाल बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथरूड गावचा महिला शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कांताबाई कदम शेतकरी महिला माधुरी कदम या महिलेची पाच एकर शेती आहे यात पन्नास हजार रुपये खर्च करून सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन उगवून आला नाही. परत पेरणी करावी लागली. दुसऱ्यांदा पेरणीसाठी गोल्ड लोन काढलं. आता अतिवृष्टीने सर्वच पीक खराब झाले आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकरी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Axe Attack : भयानक! पत्नी अन् मुलासमोरच कुऱ्हाडीनं शीर केलं धडावेगळं, अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या

India-Pakistan Match: 'माझा देश माझं कुंकू' मोहीम;भारत-पाक सामन्यावरुन ठाकरे आक्रमक

Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

RBI News : आता EMI चुकला तर फोन होणार बंद, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

SCROLL FOR NEXT