Satish  Saam
महाराष्ट्र

Satish Bhosale: माज उतरवला! खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाचा दणका

Satish Bhosale Goons House Demolished: सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोझर फिरवला आहे. बुलडोझर फिरवण्याआधी त्याच्या घराची झडती करण्यात आलीय.

Bhagyashree Kamble

गरीबाला अमानुष मारहाण करत दहशत माजवणारा गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याचाच आता माज उतरवला आहे. खोक्याच्या बेकायदा घरावर वनविभागानं बुलडोझर फिरवला आहे. वनविभागानं ही बेधडक कारवाई करून खोक्याची दहशत एकप्रकारे मोडून काढली आहे.

शिरूर कासारपासून काही अंतरावर त्याचं घर आहे. बुलडोझर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली होती. त्याच्या घरातील सामान काढले. नंतर त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर फिरवला.

खोक्याच्या शिरूर येथील बेकायदेशीर घरावर वन विभागानं बुलडोझर फिरवला आहे. खोक्याचं घर जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाच्या जागेवर हे अनधिकृत घर बांधण्यात आलं होतं. त्यामुळे वन विभागाने ही कारवाई केलीय. कारवाई करण्यापूर्वी वन विभागानं खोक्याला नोटीस पाठवली होती. मात्र, ४८ तासांमध्ये उत्तर न आल्यामुळे त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून खोक्या भोसले चर्चेत होता. मारहाण प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर तो प्रयागराजमध्ये सापडला. त्याला बीडमध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वन विभागानं त्याच्या अनधिकृत घरावर धाड टाकली होती. खोक्याच्या घरात धारदार शस्त्र, जाळी, प्राण्यांचे मांस असे अनेक गोष्टी आढळल्या होत्या. त्यानं आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार केली आहे. खोक्याचं अनधिकृत घर देखील वन विभागाच्या जागेवर असल्याचं समोर आल्यामुळे वन विभागानं कारवाई करत खोक्याचं घर जमीनदोस्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT