Beed News
Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : तुरीच्या बियाण्यातून फसवणूक; ३ वर्ष लढला व जिंकलाही, कोर्टाने दिले भरपाईचे आदेश

विनोद जिरे

बीड : बियाणे खरेदी करताना अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. पण फसवणूक झाल्यास लढायचं कसं ? याचे उत्तम उदाहरण बीडच्या गेवराईतील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका तुरीच्या कंपनीचे बी शेतकऱ्यांनी पेरलं. मात्र ते बियाणे वांज निघालं. यामध्ये शेतकऱ्यांना चांगलाच भुर्दंड बसला. याच्या विरोधात गेवराई येथील एका शेतकऱ्याने लढायचं ठरवलं आणि आता त्यांन ही लढाई देखील जिंकली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराईतील शेतकऱ्यांनी ३ वर्षांपूर्वी तुरीची लागवड केली. तूर उगवली मात्र ती वांज निघाली. याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी करायला सुरुवात केली. मात्र त्यांना कुठेही काही भरपाई मिळेल असं दिसलं नाही. अनेक शेतकरी (farmer) खचून गेले. मात्र एका शेतकऱ्याने आपल्याला नुकसान भरपाई मिळावी; यासाठी प्रयत्न सुरू केले. सुनील टकले असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

८० हजाराची मिळणार भरपाई 

सुनीलने या तुरीच्या पिकाचे नुकसान झालं, त्यावेळी त्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले. मात्र न्याय मिळाला नाही. त्यानंतर त्याने कंझुमर कोर्टामध्ये (Court) तक्रार दाखल केली. तीन वर्षानंतर या शेतकऱ्याला आता न्याय मिळाला आहे. झालेल्या नुकसानीच्या पैशासह इतर खर्चासह याला कंपनीने मदत करण्याची ऑर्डर कोर्टाने दिली. त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. एक एकर प्रति नुकसाना प्रमाणे ७० हजार रुपये व मानसिक त्रासा पोटी ५ हजार रुपये आणि त्याचा झालेला खर्च ५ हजार असे एकूण ८० हजार रुपये देण्याचं कोर्टाने नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

Team India's Victory Parade In Mumbai Live: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सन्मान, BCCI ने दिला 125 कोटी रुपयांचा धनादेश

Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते होताच राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पंतप्रधानांच्या बालेकिल्ल्यात भाजपला हरवण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT