Beed Credit Card Online Fraud Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News: क्रेडिट कार्डधारकाला सायबर चोरट्याकडून तब्बल पावणेसहा लाखांचा गंडा; बीडमधील खळबळजनक घटना

Beed Latest Crime News: बीडमधील एका क्रेडिकार्डधारकाला सायबर चोरट्याने तब्बल पावणेसहा लाखांचा गंडा घातला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विनोद जिरे

Beed Credit Card Online Fraud

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्यामुळे सायबर गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. अनेकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत आहे. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये घडला आहे. बीडमधील एका क्रेडिकार्डधारकाला सायबर चोरट्याने तब्बल पावणेसहा लाखांचा गंडा घातला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातल्या सारंगनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देतो, असं सांगत सायबर चोरट्याने क्रेडिटकार्ड धारकाला फोन केला. मोबाइलवर एप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून, त्याने क्रेडिट कार्डधारकाच्या खात्यावरून तब्बल ५ लाख ६३ हजार ७४२ रुपये परस्पर काढले

याप्रकरणी क्रेडिट कार्डधारकाने दिलेल्या तक्रारीनंतर बीड (Beed News) येथील सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६, ६६-सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पांडुरंग चंद्रकांत गादेकर, असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते अंबाजोगाई शहरातील सारनाथनगर परिसरातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग गादेकर यांना 18 जानेवारी रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीने मोबाइलवरून संपर्क साधला.

आयसीआयसीआय बँक खाते क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने त्यांना आयफोन मोबाइल पे एप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. एप्लिकेशन डाउनलोड करताचं , गादेकर यांच्या खात्यावरून तब्बल ५ लाख ७३ हजार ७४२ रुपये कट झाले.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गादेकर यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. त्यांनी तातडीने बीड येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT