Beed Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Heavy Rain: ढगफुटी सदृश्य पाऊस; आष्टी तालुक्यातील अनेक गावांचा तुटला संपर्क

विनोद जिरे

बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील पांढरी गावपरिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झालाय. तब्बल 4 तास पडलेल्या या पावसाने पांढरी गावासह (Beed) बीड-अहमदनगर मुख्य महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. तर तालुक्यातील अनेक गावखेड्यातील नद्यांसह ओढ्यांना पूर आलाय. यामळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय. (Letest Marathi News)

Heavy Rain

बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. तर आज ढगफुटी सदृष्‍य पाऊस झाल्‍याने नदी– नाल्‍यांना मोठा पुर आला आहे. रस्‍त्‍यांवर देखील पाणी साचले असल्‍याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पांढरी गावासह बीड- अहमदनगर मुख्य महामार्गावर पाणीच पाणी असल्‍याने वाहतुक देखील विस्‍कळीत झाली आहे.

पिके पाण्याखाली

विशेष म्हणजे या परिसरातील शेकडो एकर शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी यासह अन्य पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्ग संकटाने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची पुन्हा एकदा राख रांगोळी झाली असून येणारा दिवाळी सण कसा करावा? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. यामुळे मायबाप सरकारने याची दखल घेऊन तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

SCROLL FOR NEXT