Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : अज्ञाताकडून गोठ्याला आग; चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू, शेती अवजारांचाही कोळसा

Beed News : बीड तालुक्यातील ढेकनमोहा या गावात सदरची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. शेतकरी श्रीराम थापडे यांचे गावाच्या बाहेर गुरांचा चारा तसेच शेती अवजारे ठेवण्यासाठी गोठा बनविलेला आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : शेतीची अवजारे, गुरांचा चारा ठेवण्यासाठी शेतकऱ्याने बांधलेल्या गोठ्याला अज्ञाताने आग लावल्याची घटना ढेकनमोहा येथे घडली आहे. आग लागली यावेळी गोठ्यात शेतकऱ्याने शेळ्या देखील बांधलेल्या होत्या. आगीमुळे चार शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच शेतीच्या अवजारांसह चार जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

बीड तालुक्यातील ढेकनमोहा या गावात सदरची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. गावातील शेतकरी श्रीराम थापडे यांचे गावाच्या बाहेर गुरांचा चारा तसेच शेती अवजारे ठेवण्यासाठी गोठा बनविलेला आहे. याच ठिकाणी पालन केलेल्या शेळ्या देखील बांधून ठेवलेल्या असताना. दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोठ्याला आग लावून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आगीत दोन शेळ्या व दोन बोकडांचा होरपळून मृत्यु झाला.

गावकऱ्यांचा आग विझविणासाठी प्रयत्न 
गोठ्याला लागलेली आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी धाव घेतली. तसेच आग लागल्यानंतर गोठ्यात असलेल्या शेळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे या आगीत गोठ्यात ठेवलेले सर्व शेती उपयोगी साहित्य तसेच कडब्याची गंजही पूर्णतः जळून खाक झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान महसूल प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला आहे. तर प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी श्रीराम थापडे व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT