Beed Crime News 
महाराष्ट्र

Babasaheb Age : बीडमध्ये भाजप नेत्याची भरदुपारी धारदार कोयत्याने हत्या, रक्ताच्या थारोळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या. हत्या झाल्यानंतरचा रक्तरंजित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Babasaheb Age murder Beed News : बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभा विस्तारकाची बीडमध्ये धारधार कोयत्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबासाहेब आगे (Babasaheb Age murder in Majalgaon) असे भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. माजलगावच्या कीट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची धारधार कोयत्याने हत्या करण्यात आली.

बीडमधील माजलगाव शहरात भरदिवसा भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली.

धारदार शस्त्राने वार केल्याने बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही माजलगावच्या कीट्टी आडगाव येथे घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे यांची हत्या नेमकी हत्या कोणी आणि कोणत्या कारणाने केली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नही. पोलिसांकडून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील खुणाचे सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आली. बाबासाहेब आगे हे भाजप लोकसभा विस्तारक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती. आगे यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. याप्रकरणी आरोपी नारायण फपाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. बीड पोलिसांकडून कसून तपास केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT